पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) हे आज (14 जून) रोजी देहूत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा (Tukaram Maharaj Shila Temple) लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीला छावणीचे स्वरूप आलेलं आहे. शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मात्र, हे शिळा मंदिर नेमकं आहे तरी कसं? याची उत्सुकता अनेकांना लागलीय. तर जाणून घेऊयात….
…..म्हणून मंदिराला शिळा मंदिर असं संबोधलं जातं
संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या (Indrayani river )डोहामध्ये विसर्जित केल्यानंतर अवघ्या १३ दिवसानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी प्राशन केलं नाही. तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर अन्नपाण्याशिवाय बसले होते, तीच हि शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य असं मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता. म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून या मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.
संत तुकाराम (Tukaram Maharaj )महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं होतं म्हणून शिळा मंदिराची कळसापर्यंतची उंची 42 फुटांची आहे. त्याचबरोबर शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संत तुकोबांची काळ्या पाषाणातील ही मूर्ती 42 दिवसांमध्ये उभारली आहे.