मुंबई : राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) निकालाचे राजकीय पडसाद आता उमटू लागलेत. संख्याबळ असतानाही शिवसेनेच्या ( Shivsena) उमेदवार पडलाच कसा याची चर्चा असताना दुसरीकडं कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर ( Shivsena Bhawan ) बॅनरबाजी करण्यात आली आहे. संभाजीराजेंनी शनिवारी शिवसेनेवर निशाणा साधणारं ट्वीट केलं होतं. मात्र आता छत्रपती यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार असा मजकूर या बॅनरवर पहायला मिळत आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर ( Rajyasabha Sixth Seat) छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष दावा सांगितला होता. मात्र शिवसेनेनं त्यांना पक्ष प्रवेश करावा अशी अट घातली. छत्रपती संभाजीराजे यांनी त्याला नकार दिला होता. छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या छत्रपती संभाजी यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.
दरम्यान राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार ( Sanjay Pawar ) यांच्या पराभवानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून शिवसेनेविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार असा मजकूर या बॅनरवर आहे. त्याशिवाय, ‘राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य में 2024 अभी बाकी है’ असा मजकूर ही या बॅनरवर आहे.