मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं नेहमीच चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड ( Shivsena MLA Sanjay Gaikwad) आज पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले ते वादग्रस्त वक्तव्यानं नव्हे तर . एका वेगळ्या निर्णयाने.आमदार गायकवाड होण्यापूर्वी ते एक सामान्य शिवसैनिक ( Shivsainik) होते, मात्र आमदार झाल्यावरही ते सामान्यच आहेत. याचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून पहायला मिळालाय. राज्यातील इतर आमदारांच्या डोळ्यात गायकवाडांची ही कृती झणझणीत अंजन घालणारी आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची ( Cross Voting) किंवा मतं फुटण्याची भीती असल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena) आणि भाजपनं (BJP) आपापल्या आमदारांना मुंबईतील फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार डिलक्स हॉटेलमध्ये ठेवलंय. त्यात आमदार संजय गायकवाड देखील होते. त्या ठिकाणचा अफाट खर्च गायकवाडांना काही फारसा आवडला नाही. (Five Star, Seven Star, Delux Hotels In Mumbai)
फाईव्ह स्टार संस्कृती त्यांना पचनी पडली नाही. ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thakreay) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)_ यांची भेट घेऊन आपण या ठिकाणी राहू शकत नाही असं त्यांना कळवलं. त्यानंतर तात्काळ फाईव्ह स्टार हॉटेल सोडून आपलं आमदार निवासातील घर गाठलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असलं तरीही गायकवाडांच्या या कृतीचं आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही कौतुक केलं जात आहे.