मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटातील भव्यदिव्यपणाचे आपण नेहमीच गोडवे गात असतो. मराठीत अशा फिल्म का येत नाहीत अशीही आपली तक्रार असते.हर हर महादेव हा चित्रपट मराठीसह हिंदी तामिळ तेलगू आणि कन्नड या पाच भाषांमध्ये एकाच वेळेस प्रदर्शित होणार आहे. ( Har Har Mahadev movie teaser out )
मराठी इतिहासात आजवर कधीच न घडलेला हा पराक्रम लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे करणार आहेत. प्राप्त माहितीनुसार दिवाळीच्या आसपास हा चित्रपट बिग स्क्रीन वर पाहायला मिळेल. चित्रपटाबद्दल सांगताना जी स्टुडिओचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी (Mangesh Kulakarni ) सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य एवढे महान आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं कधीच मर्यादित राहू शकणार नाही. ( Chatrapati Shivaji Maharaj movie in five language )
महाराजांची युद्धनीती, त्यांनी अवलंबलेले संघटन कौशल्य हे साऱ्या जगभरात आजही अभ्यासला जातं. त्यामुळे आपला खरा प्रेरणादायी इतिहास तेवढ्याच भव्यतेने जगासमोर मांडणं ही भावना आमच्या मनात होती.
या भावनेतूनच आम्ही हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाची विशेष बाब म्हणजे अनेक हॉलिवूड पदांवर काम करणारे VFX तंत्रज्ञ या चित्रपटाचेही VFX करणार आहेत. त्यामुळे महाराज यांच्या या चित्रपटाला आता ग्लोबल टचही मिळणार आहेत.