लडाख:
लडाखमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात झाला आहे. २६ जवानांना घेऊन जाणारी एक बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत ७ जवानांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.जवानांची बस श्योक नदीत कोसळली. बसमध्ये २६ जवान होते. जवळपास बस ५० ते ६० फूट खोल कोसळल्यानं जवळपास सगळेच जवान जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी परतापूर येथील ४०३ फील्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्जिकल टीमला लेहहून परतापूरला पाठवण्यात आलं. थोइसपासून २५ किलोमीटर अंतरावर लष्करी जवानांच्या बसला अपघात झाला.
गंभीर जखमी झालेल्या जवानांच्या मदतीसाठी हवाई दलाशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांना उपचारांसाठी वेस्टर्न कमांडला पाठवलं जाऊ शकतं. बसला अपघात कशामुळे झाला, यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. लष्करानं अद्याप तरी अपघाताबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही. ट्रांझिस्ट कॅम्पहून सब सेक्टर हनिफला जात असताना बसला अपघात झाला.
7 Indian Army soldiers lost their lives so far in a vehicle accident in Turtuk sector (Ladakh), grievous injuries to others too. Efforts on to ensure best medical care for injured, incl requisition of air effort from IAF to shift more serious ones to Western Command: Army Sources
— ANI (@ANI) May 27, 2022