पुणे : पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
संभाजी ब्रिगेड संघटनेनं यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याप्रकरणी विरोधही दर्शवला होता.
ट्विटरवर याप्रकरणी व्यक्त होताना आव्हाड म्हणाले की, पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही,
कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका”, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही असतात. मात्र तरीही संबंधित कलाकार आणि तरुणांनी सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याचा आरोप होतोय.कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केलंय तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचं समोर आलंय. पुण्यात राष्ट्रवादीकडूनही याप्रकरणी आंदोलन करण्यात येत आहे.