नवी दिल्ली : देशातल्या महागाईनं नऊ वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला. महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली असताना तेल कंपन्या मात्र मालामाल झाल्या आहेत. वारंवार किमती वाढवणाऱ्या या तेल कंपन्यांनी हजारो कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे
इंडियन ऑइल या भारतातील सर्वात मोठ्या तेल कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 24 हजार कोटींचा नफा कमविला आहे. इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारातही महागाईने उच्चांक गाठला आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला एकीकडे बोजा पडत असताना दुसरीकडे तेल कंपन्या मात्र मालामाल झाल्याचे चित्र सध्या देशात पाहायला मिळत आहे.