TOD Marathi

नवी दिल्ली : उष्णतेनं हैराण झालेल्या देशातील जनतेसाठी एक खुशखबर आली आहे.  यावर्षी मान्सूनचआगमन वेळेपूर्वीच होणार आहे. येत्या 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याचं भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढील सात दिवसात मान्सून राज्यात येऊन धडकणार आहे.

भारतात पाच दिवस मान्सून आधी धडकणार असल्यानं अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार असल्याचंही बोललं जात आहे.  दरवर्षी अंदमानमध्ये मान्सून 22 मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.

 

दरम्यान बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.