सोलापूर : रणजीतसिंह डिसले गुरुजींच्या निलंबनाच्या प्रशासकीय कारवाईला वेग आला असून प्राथमिक शिक्षण विभागाने दोषारोप प्रस्ताव दाखल केला आहे. या दोषारोप प्रस्तावावर सामान्य प्रशासनाकडून पडताळणी करण्यात आली. सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे कारवाई संदर्भातील आहवाल सादर करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत डिसले गुरूजींच्या “ग्लोबल” पुरस्कारावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
डिसले गुरुजी हे आध्यन पगारी रजेची मागणी करिता जिल्हा परिषदेत आले होते. त्यांची परदेशातील शिष्यवृत्ती मंजूर झाल्याने परदेशात शिक्षणासाठी परवानगी देण्याची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे केली होती. मात्र राजा देण्यासंदर्भातील गुरुजींच्या फाईलची पडताळणी केली असता डिसले गुरुजी तीन वर्षापासून गैरहजर असल्याचा चौकशी समितीचा आहवाल शिक्षणधिकारी यांच्या समोर आला आहे. या चौकशी समितीत डिसले गुरूजी कायदेशीर कारवाईस पात्र असल्याचे समितीकडून कळवण्यात आले आहे. प्रशासकीय कारवाई करण्यासाठी दोन वेळेस संजयकूमार राठोड यांच्याकडे फाईल सादर करण्यात आली होती. मात्र संजयकूमार राठोड यांनी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले होते. परंतु आता या प्रलंबीत प्रशासकीय कारवाईला उजाळा मिळाला आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमाशी बोलताना डिसले गुरुजींनी जिल्हा परिषद,आणि शिक्षणविभागावर लाच मागत असल्याचा व मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर सीईओ स्वामी यांनी नोटीसाद्वारे जाब विचारला असता , मी अनावधनाने बोललो असल्याची कबूली देत डिसले गुरुजींनी माफीनामा सादर केला होता होता. डिसलेंच्या चुकीला माफी मिळणार नाही असे म्हणत सीईओ स्वामींनी त्यांचा माफीनामा फेटाळला आहे.