मुंबई: शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. शुक्रवारी मार्केट बंद होताना प्रमुख इक्विटी निर्देशांक घसरल्याचं दिसून आलं. गुरुवारी शेअर मार्केटमध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली होती. गुरुवारच्या घसरणीनंतर आजही शेअर मार्केटमध्ये घसरण झाली असून सेन्सेक्स ८०० अंकानी घसरला आहे.
तज्ज्ञांच्या मते, या वर्षी भारतातील प्रमुख स्टॉक इंडेक्समध्ये झालेली वाढ, प्रचंड तरलता आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या संख्येमध्ये ओव्हर व्हॅल्यूएशनची चिंता वाढली आहे. जागतिक बाजारपेठेतील घसरलेला गुंतवणुकीचा दर आणि परकीय निधीच्या निर्गुंतवणूकीच्या प्रवाहात सातत्य या कारणांमुळे BSE सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरले आणि ते ५९,१०४ वर आले.
निफ्टीचा विचार करता वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स, मिडकॅप आणि बँकांच्या शेअर्स घसरत असून ते रेड मार्क मध्ये आहेत. दुसरीकडे इंडसइंड बँक, बजाज, एल अॅन्ड टी, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी यांच्या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून आलंय.