मुंबई: १०० कोटी लसीकरण झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं आणि देशभरात याचा गाजावाजा सुरू झाला. मात्र खरंच १०० कोटी लासिकरणाचा आकडा भारताने गाठला आहे का ? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे, १०० कोटी लसीकरण पूर्ण केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्याच सोबत आता आंतराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज जॉन हॉपकीन्स संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीत भारताच्या लसीकरणाच्या आणि टक्केवारीच्या आकडेवारीचा भांडाफोड करणारा अहवाल प्रसिध्द केला आहे.
जॉन हॉपकीन्सच्या आकडेवारीनुसार भारतामधे ९८ कोटी ६१ लाख ९६ हजार ७७५ इतके कोविड डोसेस देण्यात आले आहेत. एकुण लसीकरण झालेल्या लोकांची संख्या २८ कोटी ८० लाख ८ हजार ३३६ इतकी असून दोन्ही डोस घेऊन पुर्ण लसीकरण झालेल्या देशाच्या लोकसंख्येची टक्केवारी २०.५५ % इतकी आहे.
वरीष्ठ पत्रकार राजदिप सरदेसाई यांनी याबाबत एक ट्विट केलं असून यामधे जगाच्या आकडेवारीबरोबरच जॉन हॉपकीन्स संस्थेचा अहवाल जोडला आहे. आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधे दुसऱ्या क्रमांकावरील देश असून फक्त २१ टक्के लोकापर्यंत कोविडच्या दोन्ही लसी देऊ शकलो आहे, याबाबत भाष्य केलं आहे.
जगाची तुलना जागतिक सरासरीच्या तुलनेत अधिक लसीकरण असलेल्या देशामधे ८९ देशांचा समावएश आहे. त्यानंतर जागतिक सरासरीपेक्षा कमी असलेल्या लसीकरणामधे भारताचा क्रमांक लागतो, या जागतिक लसीकरणाच्या यादीत देशाच्या एकुण लसीकरण टक्केवारीमधे १०४ क्रमांकावर भारत आहे.