सोलापूर: दिल्लीवरूवरून महाविकासाघाडी सरकारला विविध गोष्टींवरून रोज त्रास दिला जातोय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज(गुरूवार) विधान केलं आहे. सोलापुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
शरद पवार म्हणाले, असं का केलं गेलं? याबाबत मला दिल्लीमध्ये एका सत्ताधारी मंत्र्याने सांगितलं की, तुमचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. पण त्या दिवशी तुम्ही जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केला, ते काही रूचलं नाही आणि म्हणून तुमच्याकडे पाहुणाचार झाला. तुम्ही छापा मारा नाहीतर काही वाटेल ते करा. पण आपलं मत कधी सोडणार नाही. सामान्य माणसांची बांधिलकी कदापी सोडणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
महाविकस आघाडी सरकार अत्यंत समंजसपणे काम करत आहे, अतिवृष्टी झाली तेव्हा आता पहिला हप्ता देण्यासाठी ३६० कोटी रुपये काल दिलेत, आणखी दिले जाणार आहेत. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढायचं आहे. त्याच्या भल्यासाठी सरकार आहे, ही भूमिका असताना दिल्लीवरून या सरकारला अनेक गोष्टींवरून रोज त्रास दिला जातोय, असा आरोपही त्यांनी यावेळी केंद्रसरकारवर केला आहे.