TOD Marathi

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र, आता एका प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. माझ्या बदनामीबाबत माफी मागा. अन्यथा मानहानीचे प्रकरण न्यायालयात दाखल करणार, असा इशारा संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिलाय.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्याबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. पत्नी वर्षा राऊत यांच्या झालेल्या ईडी चौकशीत चंद्रकांत पाटील यांनी आपला चुकीचा संदर्भ जोडल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.

या आधी सुद्धा संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात अनेक वेळा असेच शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. त्यांच्यात होणाऱ्या या शाब्दिक चकमकी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. या पूर्वी संजय राऊत यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं.