TOD Marathi

नाशिक: प्रभाग रचनेविरोधात जनतेने कोर्टाची पायरी चढावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. मात्र, नागरिकांंनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आक्रमक झाली असून, त्यांनी या फेररचनेविरोधात थेट राज्यपालांकडे दाद मागितली आहे.

तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा २००७ मध्ये शिवसेना आणि भाजपला झाला होता त्यामुळे याचा फटका राष्ट्रवादी , कॉंग्रेस आणि मनसे सारख्या पक्षांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठवला आहे. नागरिकांनी या विरोधात कोर्टात जावे, असे आवाहन देखील त्यांनी केले होते मात्र त्याला कोणी प्रतिसाद दिला नसल्यामुळे आता थेट राज्यपालांकडे प्रभाग रचनेविरोधात दाद मागितली आहे.

नाशिक मनसेने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे पुन्हा एकदा तीन सदस्यीय फेररचनेची मागणी केली आहे. तसे निवेदन यांना दिले आहे. सोबतच मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड रतनकुमार इचम यांनी सोमवारी याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.