मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले होते. भाजपने धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी तीव्र आंदोलने केली होती.
येत्या ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. तर, काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्यास देखील परवानगी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 24, 2021
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.