नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन २४ सप्टेंबरला अमेरिकेची राजधानी वॉग्शिंटन इथं भेटणार आहेत. बायडन सत्तेवर आल्यानंतर ही पहिली वेळ असेल, जेव्हा बायडन आणि मोदी एकमेकांना भेटतील. मात्र, या दौऱ्यात अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण, पंतप्रधान मोदींनी घेतलेली कोव्हॅक्सिनची लस. या लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून म्हणजेच WHO कडून मान्यता मिळालेली नाही.
अमेरिकेत क्वाड देशांची बैठक होणार आहे. यामध्ये भारत-अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि जापानचे पंतप्रधान सामील होतील. या दौऱ्यात तालिबान, चीन आणि कोरोनावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर २५ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्राला संबोधित करणार आहेत. मात्र आता या दौऱ्यात अडथळा निर्माण झालाय तो म्हणजे मोदींनी घेतलेल्या लसीचा. त्यांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे आणि या लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळाली नाहीये.
कोव्हॅक्सिनबाबत जागतिक आरोग्य संघटनेला ट्रायलचा सगळा डेटा पाठवण्यात आला आहे. या डेटावर सध्या आरोग्य संघटनेकडून अभ्यास सुरु आहे. लवकरच जागतिक आरोग्य संघटना सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी व्यक्त केली.