टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 सप्टेंबर 2021 – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलेलं आहे. मराठा संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारला इशारा देत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. त्यावेळी या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन दिलं.
या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही केली आहे. पण, भाजपच्या प्रतिनिधींनी या निवदेनावर सही करणं टाळलं आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात एकमत नसल्याचं दिसून आलं.
राष्ट्रपतींना भेटण्यासाठी शिष्टमंडळ पोहोचलं त्यावेळी निवेदनावर भाजप खासदारीच स्वाक्षरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी याबाबत विचारला केलीय. राष्ट्रपतीनी चौकशी केल्यानंतर मात्र भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या निवेदनावर स्वाक्षरी केल्याची माहिती मिळत आहे.
संभाजीराजे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना आपले प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केलं होतं. त्याला राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रतिनिधी पाठवले. त्यात शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचा समावेश होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीपूर्वी संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली.
मराठा आरक्षणप्रश्नी घटनादुरुस्ती करत राज्यांना अधिकार दिले असले तरी 50 टक्क्यांची मर्यादा काढावी, अशी मागणी यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून केली आहे. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिली आहे. तर आम्ही आरक्षणासाठी एकत्र आहोत. पण, 50 टक्क्यांची मर्यादा वाढवण्यावर एकमत नाही, असे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितलं. तसेच गरज पडल्यास शक्य ती सर्व मदत करणार असे ही रणजितसिंह यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. https://t.co/CJYDLEIltu pic.twitter.com/o9rTa2KxyR
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 2, 2021