टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 ऑगस्ट 2021 – 100 कोटी वसुली प्रकरणी बडतर्फ असलेल्या एपीआय सचिन वाझेच्या संभाषणाचा आणि बैठकीतील रेकॉर्डिंगच्या क्लिपचा तपास लागला आहे. नेमकं वसुलीमधील ‘नंबर वन’ कोण आहे?, कोण सांगत होतं वसुली करण्यासाठी? याचा छडा पोलिसांनी लावला आहे. वसुली करायला लावणारी ‘नंबर वन’ व्यक्ती हि तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेच असल्याबद्दल पुष्टी मिळत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, सचिन वाझेने जेव्हा ‘सीआययू’मध्ये कार्यरत होता, तेव्हा हॉटेल-बार चालकांकडून वसुलीवेळी ‘नंबर वन’च्या केलेल्या उल्लेखाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे ‘नंबर वन’ हि व्यक्ती कोण आहे? याचा खुलासा होत नव्हता.
त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिसांच्या रडारवर होते. मात्र, आता ‘नंबर वन’ व्यक्ती परमबीर सिंह हेच असल्याबद्दल पुष्टी मिळाली आहे.
नंबर वन म्हणजे सीपी परमबीर साहेबच, असे वाझेने आपल्याला स्पष्ट सांगितले होते, असा दावा तक्रारदार हॉटल मालक बिमल अग्रवाल याने पोलिसांकडे केलाय. त्यासाठी सचिन वाझेसोबतच्या संभाषण आणि बैठकीतील रेकॉर्डिंगच्या क्लिप सादर केल्यात.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना संबोधून ‘नंबर वन’ उल्लेख केला असल्याचे परमबीर आणि सचिन वाझेकडून सांगितले जात होते, असे तपास यंत्रणा आणि विरोधकांकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र, आता अग्रवालच्या जबाबातून या प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे, असे
अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सचिन वाझे हा हॉटेलचालक, बुकी आणि बीएमसी कॉन्ट्रॅक्टरर्सकडून हप्ता वसुली करण्यासाठी अग्रवालच्या मागे लागला होता. जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या दरम्यान त्याच्या भेटीगाठी आणि व्हाॅट्असप कॉलवरून वारंवार संपर्कात होता. सचिन वाझे त्याला सीआययू, युनिट -११च्या कार्यालयामध्ये बोलवत असे. तर काहीवेळा अग्रवालच्या मर्सिडीजमध्ये बसून चर्चा करीत असत असे.
३१ ऑगस्ट २०२० रोजी त्याने यूनिट ११ मध्ये बोलावले होते. त्यावेळी सचिन वाझेने त्याला सांगितले की, ‘एक नंबर’ची कोरोनामुळे ६ महिने कमाई झाली नाही. त्यामुळे त्यानी २ कोटींची वसुली करण्यास सांगितलं आहे. त्यावेळी अग्रवालने खात्री करून घेण्यासाठी एक नंबर म्हणजे कोण आहे ? असे विचारल्यावर सचिन वाझेने सीपी परमबीर सिंह यांचं नाव घेतलं, असा स्पष्ट सांगिल्याचा दावा त्याने केलाय.
हॉटेल, बीएमसी कंत्राटदारांबरोबर सेंटिग झाल्यानंतर तुला ‘एक नंबर’कडे घेऊन जातो. अगोदर पेंडिंग प्रकरणे संपवून टाकू, असे आश्वासन वाझेने दिले होते. त्यानंतर मात्र या कामातून त्याने हात झटकून घेतले आहेत, असा दावा केलाय. जबाबात सुमारे ७० क्लिप्स अधिकाऱ्यांकडे दिल्यात.
म्हणून टाकला छापा –
क्रिकेट बुकीकडून वसुली करण्यासाठी अग्रवालने महेश भाई आणि मन्नन नायक यांची सचिन वाझेशी भेट करून दिली होती. मात्र, त्याच्याकडून सेटलमेंट झाली नाही, त्यामुळे ८ सप्टेंबर २०२० ला धवल जैन नावाच्या बुकीवर छापा टाकला होता.
त्यात अन्य बुकींना फरारी आरोपी दाखवले होते, तसेच त्यांच्याकडून मोठी वसुली केली होती. ज्यांनी काही दिले नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. तर मन्नन नायक याच्याकडे सचिन वाझेने २ कोटीची मागणी केली होती, अशीही माहिती यातून समोर आली आहे.