टिओडी मराठी, पुणे, दि. 19 ऑगस्ट 2021 – भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भोसरी एमआयडीसीमधील रेडीन्स पाॅलिमर या कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांना कंपनी सेफ्टीचे ट्रेनिंग दिले. या ट्रेनिंगसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
कंपनीत आग कशाप्रकारे लागू शकते?. आग विझविण्यासाठी कशाप्रकारे कृती करावी?. याबाबतचे ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना देण्यात आले. अलीकडच्या काळामध्ये कंपनीला लागणाऱ्या आगीच्या पार्श्वभूमीवर हे ट्रेनिंग महत्वाचे आहे, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.
यावेळी कंपनीचे डायरेक्टर गिरीश देशपांडे, रवी मुदगल आणि गिरीधर राव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्लांट हेड बबन भोसले, प्रकाश चव्हाण, विष्णु हुलगुले, सोनाली शिंदे, मीनीनाथ गायकवाड आदी स्टाफ मेंबर्स उपस्थित होते. या ट्रेनिंगचे आयोजन कंपनीचे एचआर सौरभ भडके आणि अतुल पाटील यांनी केले होते.