TOD Marathi

टिओडी मराठी, यवत, दि. 19 ऑगस्ट 2021 – भाजपचे नेते तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या राहू (ता.दौंड, जि. पुणे) येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षा कांचन कुल यांनी देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तसेच भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षा कांचन कुल यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार रणजित मोहिते-पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते यांना राखी बांधून रक्षाबंधन देखील साजरे केले.

आमदार राहुल कुल यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कूल कुटुंबीयांचे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.

भविष्यात त्यांना सामाजिक कार्यात सर्व प्रकारे मदत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने आमदार राहुल कूल समर्थकांत आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.