टिओडी मराठी, दि. 18 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यांत अनेक केंद्रीय मंत्र्यांकडून काढण्यात येणारी ‘जन आशीर्वाद यात्रा’ ही करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. यावर शिवसेनेकाढून निशाणा साधला आहे.
यावेळी ठाणे शहरामध्ये सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा विनापरवाना काढल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी यात्रेचे आयोजन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यात्रेमध्ये करोना नियमांचे उल्लंघन झाल्याची नोंद या गुन्ह्यामध्ये घेतली आहे. यावर शिवसेना खासदार खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राज्यांत अनेक केंद्रीय मंत्र्यांकडून काढण्यात येणारी ‘जन आशीर्वाद यात्रा’ ही करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांनी भाजपला संयम बाळगण्यास सांगितले आहे. जन आशीर्वाद यात्रा ही करोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचे तुम्ही शक्तीप्रदर्शन करत आहात.
हे एक प्रकारे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा इशारा दिलाय. राज्याला अडचणीत आणण्यासाठी आपण हे मुद्दाम करत आहेत. ठीक आहे पण किमान तुम्ही संयम पाळा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संजय राऊत यांना उत्तर देत म्हणाले, कृपया संजय राऊत यांना सांगा की, हे माझ्या लक्षात आले आहे. पण, आम्ही सरकारची धोरणे लोकांपर्यंत नेणे थांबवू शकत नाही. मी हे म्हणू नये, पण जेव्हा ते मास्क न घालता, एकमेकांच्या जवळ उभे असतानाही आणि सभागृहातील तेव्हाची दृश्ये पहा.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली पालघर इथून निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेत मंगळवारी भाजपने शक्तीप्रदर्शन केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर डॉ. पवार पहिल्यांदा जिल्ह्य़ात आल्यामुळे ठिकठिकाणी सत्कार सोहळे रंगले आहेत.
मास्कविना अनेक जण वावरत होते. छोटेखानी कार्यक्रमामध्ये सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले नाही. यात्रेच्या निमित्ताने पक्षीय प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे.
Please tell Sanjay Raut that I've taken note of this but we don't stop taking govt policies to the people. I shouldn't say this but look at the scenes when concerned leaders aren't wearing masks, are in close proximity to each other&are in the well of the House: Union Min HS Puri pic.twitter.com/qCUP74YJu8
— ANI (@ANI) August 18, 2021