टिओडी मराठी, मुंबई, दि. 27 जुलै 2021 – अतिवृष्टीमुळे राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात अनेक नेते पूरग्रस्त भागात दौरे करत आहेत. यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे नेत्यांनी विनाकारण पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असे आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद केले आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देणाऱ्या मदतीच्या संदर्भातही सविस्तर माहिती त्यांनी दिली. शरद पवार यांच्या समवेत दिलीप वळसे पाटील , सुनिल तटकरे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आदी पत्रकार परिषदेत उपस्थितीत होते.
रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरामुळे आतोनात नुकसान झालं आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात माळीण घटना घडली होती, तिथे पुनवर्सन कसं केले? त्याच धर्तीवर मदत करावी. नवे गाव गावठाण उभे करणे आव्हान आहे. संकटात उभारणी करणे आवश्यक आहे, असे शरद पवारांनी सांगितलं आहे.
पूरग्रस्त भागामध्ये राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. राजकीय नेते दौरे करताना गरजेचे पूर्तता करणे गरजेचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा करणं आवश्यक आहे. पण, इतर नेत्यांनी असे दौरे टाळावेत.
अनेक लोक विनाकरण दौरा करत असल्यामुळं शासकीय यंत्रणेवर ताण येतोय. आज राज्यपाल दौरा करत आहेत, केंद्राकडून अधिक मदत मिळवून देतील, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या वेल्फेअर मदत केली जातेय. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करणार आहोत. 2 लाख मास्कचे वाटप करणार आहे. पूरग्रस्तांना अन्नधान्य, भांडी, पांघरूण, मास्क आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार आहे.
हि मदत येत्या दोन-तीन दिवसांत पोहोचवली जाणार आहे. पूरग्रस्त भागामध्ये वैद्यकीय पथक पाठवणार आहोत. केमिकल असोसिएशन वतीने औषध ही पूरग्रस्त भागात दिली जातील, असे शरद पवार यांनी दिली आहे.