टिओडी मराठी, दि. 25 जुलै 2021 – सध्या सोशल मीडियावर मागील अनेक दिवसांपासून, ‘डोर टू हेल’चे फोटो व्हायरल होताहेत. हे फोटो तुर्कमेनिस्तानचे आहेत. जेथे एका खड्ड्यामध्ये आग लागलेली आहे. तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबातपासून 260 किलोमीटर दूर काराकुम वाळवंटातील दरवेज गावातील या खड्ड्यामध्ये 47 वर्षांपासून आग लागलेली आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतेय.
या जागेला जगातील सर्वात मोठे नैसर्गिक गॅसचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. 1971 मध्ये सोव्हियत संघाच्या वैज्ञानिकांनी मिथेन गॅस जमा करण्यासाठी या ठिकाणी ड्रिलिंग केलं होतं. एके दिवशी येथे स्फोट झाला आणि त्यानंतर ‘नरकाचा दरवाजा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जागेवर आग लागली.
वैज्ञानिकांनी मिथेन गॅस पसरू नये, म्हणून या खड्ड्यात आग लावली आहे. त्यांना वाटले होते की, आग एक-दोन आठवड्यामध्ये हि आग थांबेल. मात्र, ही आग आज देखील सुरू आहे.
ज्या खड्ड्यात ही आग लागली आहे, खड्डा सुमारे 229 फूट रूंद आणि 65 फूट खोल आहे. पर्यटकांसाठी ही जागा आकर्षणाचे केंद्र बनलं आहे. अनेक ठिकाणाहून या ‘नरकाच्या दरवाजा’ला बघण्यासाठी लोक गर्दी करत असतात.