टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 जुलै 2021 – देशामध्ये सुमारे पाच वर्षांपासून पॉर्न साईट्सवर बंदी घातली आहे. यात साधारणपणे 850 हून अधिक पॉर्न साइट्सचा समावेश आहे. असे असतानाही काही आंबटशौकीनांचे पॉर्न पाहणे अद्यापही थांबलेले नाही. याबाबत राज्याचा विचार करता असे आढळले आहे कि, गुगलवरील पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील पुणे, नाशिकसह नागपूर या तीन शहरांचा प्रत्येकी पहिल्या-दुसरा व तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आलीय.
महाविद्यालयीन तरुण व तरुणींबरोबर महिलाही गुगलवर पॉर्न सर्चिंग करत आहेत, असे समोर आले आहे. अर्थात, तरुण वर्गाबरोबर महिलांनाही पॉर्न बघण्याचा मोह होत आहे, असे समोर आलं आहे.
याचबरोबर वृद्ध मंडळीही पॉर्नच्या मोहात पडल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे, पॉर्न वेबसाईटवर विविध जाहिराती दाखवून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकारही वाढलेत.
अश्लील फिल्म पाहणाऱ्यांमध्ये व पॉर्नसाईट्सना भेट देणाऱ्याच्या संख्येत सुमारे चारपट वाढ झालीय. यात शाळेतील मुलं-मुली, महाविद्यालयीन तरूण, तरुणी, महिलावर्ग आणि वृद्धांचा देखील समावेश आहे.
राज्याची उप राजधानी असलेल्या नागपूरमध्येही पॉर्न सर्चिंगचे प्रमाण वाढले आहे. आता सायबर पोलिसांनीही यावर नजर ठेवायला सुरुवात केलीय.
पॉर्न साइट्सवर बंदी घातलेली असतानाही जानेवारी 2020 मध्ये पॉर्नहबने जाहीर केलेल्या पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीमध्ये भारत पहिल्या स्थानावर होता. अनेकदा पॉर्न साईटच्या नावामध्ये बदल करूनही त्या पुन्हा उपलब्ध होतात.
टोर ब्राऊझर, मिरर साइट अथवा व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क सर्व्हिस, यांचा वापर करूनही पॉर्न पाहिले जात आहे.