TOD Marathi

टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 24 जुलै 2021 – कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून माहिती दिली जाते. तशीच माहिती सोशल मीडियावरून देखील काहीजण देत आहेत. मात्र, काहीजण जर या सोशल मीडियावरून आरोग्य व्यवस्थेबाबत खोटी माहिती देत असतील तर ती घातक आहे. याबाबत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्‍टर विवेक मूर्ती यांनी व्यक्त केलं होतं. डॉक्‍टर विवेक मूर्ती म्हणाले होते कि, सोशल मीडियावरची खोटी माहिती ही लसीकरण मोहिमेसाठी घातक ठरु शकते. आता त्यांच्यानंतर अमेरिका देशाचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही अशाच प्रकारची भूमिका मांडली आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला खोट्या माहितीमुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव आणि त्यांचे गंभीर परिणाम हे केवळ लसीकरणाच्या माध्यमातून टाळता येऊ शकतात, असे मत मूर्ती यांनी व्यक्त केलं होते.

पत्रकारांनी एका पत्रकार परिषदे दरम्यान याचसंदर्भात ज्यो बायडेन यांना प्रश्न विचारला आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्‌ससाठी तुमचा काही संदेश आहे का?.

यावेळी ज्यो बायडेन उत्तर देताना म्हणाले, सध्या आपल्याकडे केवळ लसीकरण न झालेल्यांना साथीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच सोशल मीडियावरची खोटी माहिती ही लसीकरण मोहिमेसाठी घातक ठरु शकते, अशी भूमिका मांडत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

डॉक्‍टर विवेक मूर्ती हे अमेरिकेच्या करोना टास्क फोर्सचे सदस्य आहेत. आपल्या देशातील आरोग्य व्यवस्थेला चुकीच्या माहितीमुळे मोठा व गंभीर धोका आहे, असे मूर्ती म्हणाले.

अनेकांचे जीव याच माहितीवर अवलंबून असतात. त्यामुळे एक देश म्हणून आपण चुकीच्या माहिती विरोधात एकत्र आले पाहिजे, असेही डॉक्‍टर विवेक मूर्ती यांनी स्पष्ट केलं.

खोटी, चुकीची माहिती पसरवण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याबद्दल बोलताना डॉक्‍टर विवेक मूर्ती यांनी कंपन्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसने त्यांच्या प्रोडक्‍टमध्ये आवश्‍यक ते बदल करुन चुकीच्या माहितीचा प्रसार होणार नाही. योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचेल, याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा डॉक्‍टर विवेक मूर्ती यांनी व्यक्त केली.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज