टिओडी मराठी, दि. 19 जुलै 2021 – पूर्व आफ्रिकेमध्ये समुद्री विरोधातील मोहिमेसाठी रवाना झालेल्या दक्षिण कोरियाच्या एका युद्धनौकेवरील जवान कोरोनाग्रस्त झालेत. जहाजावरील 247 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दक्षिण कोरियातील लष्करामध्ये आजवर कोरोनाची लागण झालेली ही सर्वाधिक संख्या ठरलीय. मुनमू द ग्रेट या युद्धनौकेवर असलेल्या ३०१ जवानांना परत आणण्यासाठी लष्कराची दोन लढाऊ विमाने पाठविली होती, अशी माहिती देशाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.
अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युद्धनौका एका ठिकाणी काही सामग्री भरण्यासाठी थांबलेली असताना याच वेळी कोरोनाचा शिरकाव झालाय. जहाजावर असलेल्या एकाही व्यक्तीचे कोरोना विरोधी लसीकरण झालं नाही.
आज दक्षिण कोरियामध्ये १२५२ नवे करोना रुग्ण आढळून आलेत. सलग १३ व्या दिवशी दक्षिण कोरियामध्ये १ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आलेत.
दक्षिण कोरियाहून एका पायलटसह एक विशेष पथक रवाना झाले आहेत. हे जहाज आता परत आणण्याची ही तयारी सुरू केली आहे. कोरोना संक्रमित झालेल्या एकूण जवानांपैकी तिघे आयसीयूमध्ये दाखल आहेत, अशी माहिती समोर आली आहे.