टिओडी मराठी, पुणे, दि. 16 जुलै 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. आज गुरुवारी (दि.१५ जुलै, २०२१) लोणकर कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली.
स्वप्नील च्या कुटुंबाचे पुढे काय? आई-वडिलांना पडलेल्या या प्रश्नाचे सांत्वन करतांना डॉ. निलम गोऱ्हे यांनी स्वप्नीलची लहान बहीण पूजा ला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कशी मदत करता येईल, यासाठी सरकार पातळीवर आम्ही नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.
प्राथमिक स्वरूपात वयक्तिकरित्या रूपये 50 हजाराची मदत कुटुंबीयांना केली आहे. थकीत बँकांचा कर्जाची परतफेड करण्यासाठी सहाय्य जेणेकरून कुटुंबावरचे आर्थिक वोझ कमी होईल, यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष स्वप्नीलच्या कुटुंबावर आहे, असेही यावेळी त्या म्हणाल्या.