टिओडी मराठी, दि. 11 जुलै 2021 – रस्त्याशेजारी सुविधायुक्त सुलभ शौचालयात जायचे असेल तर पैसे द्यावे लागतात, हे आपल्याला माहीत आहे. पण, जगात असेही एक खास शौचालय तयार केलं आहे जेथे शौचालयात शौचास जाणाऱ्या लोकांना पैसे दिले जातात.
साऊथ कोरियामध्ये असलेल्या असलेले हे खास आणि वैशिष्ट्यपूर्ण सुलभ शौचालय आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायंस अँण्ड टेक्नॉलॉजी या युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी हे सुलभ शौचालय तयार केलं आहे. याचे नाव त्यांनी बीवि असे ठेवले आहे.
त्यांनी या सुलभ शौचालयद्वारे साठलेल्या मलमूत्रापासून विजेची निर्मिती करत होते. हे खास शौचालय उल्सन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये तयार केले आहे.
जे विद्यार्थी या शौचालयाचा वापर करू शकतात. त्यांना बक्षीस म्हणून 10 युनिट डिजिटल चलन मिळते. या चलनाच्या मदतीने विद्यार्थी, पुस्तके, वह्या, खाण्याच्या वस्तू, फळे विकत घेतील.
हे शौचालय संपूर्णत: इकोफ्रेंडली असून कमी पाण्यात लोकांची गरज येथे भागवली जात आहे. तसेच व्हॅक्यूमच्या मदतीने मलमूत्र अंडरग्राउंडमध्ये असलेल्या टँकमध्ये आणि त्यानंतर बायोरिअॅक्टरमध्ये जमा केलं जात आहे.
या प्रक्रियेनंतर मलमूत्रात असलेल्या मिथेन वायूचे विजेत रुपांतर केले जाते. यामुळे युनिव्हर्सिटीला लागणारी विजेची गरज भरून निघते. यामुळे काहीजण याला ‘सुपर वॉटर सेव्हिंग व्हॅक्युम शौचालय’ असे देखील म्हणत आहेत.