Panaji महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; पात्रता हवी 12 वी पास

टिओडी मराठी, पणजी (गोवा), दि. 11 जुलै 2021 – गोवा राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहराच्या महानगरपालिकेत विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

यासाठी कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन लिपिक या पदांवर भरती केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.

या पदांसाठी होणार भरती :
कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer)
लोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk)

  • हि आहे पात्रता :
    या जागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासह टायपिंग येणं अनिवार्य आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
पणजी शहर महानगरपालिका, पणजी, गोवा
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2021

  • सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या

http://ccpgoa.com/home

आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

http://ccpgoa.com/pdf/Group%20-%20C%20post-07-07-2021.pdf

Please follow and like us: