टिओडी मराठी, दि. 1 जुलै 2021 – सध्या बाजारात आंब्याचा सीझन सुरु आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले असून खायला आंबट-गोड असणाऱ्या आंब्याला मागणी देखील तेवढीच आहे. म्हणून आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात. पण, तुम्ही आंबा खाताना त्याची साल फेकून देता का?. आपण आज आंब्याच्या सालीचे आरोग्यदायी गुणधर्म याबाबत माहिती घेऊया.
आंब्याची सालही बहुगुणी असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आंब्याचे साल फायदेशीर असून अँटी ऑक्सीडंट्स समृद्ध, आंब्याच्या सालामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत. साल खाल्याने पोट, स्तन, मेंदू व पाठीच्या कण्यासारख्या कर्करोगांपासून आराम मिळतो.
अनेकजण आंब्याची साल कचरा समजून फेकून दिली जाते. मात्र, आंब्याची सालीमध्ये खूप आरोग्यदायी गुणधर्म आहेत.
आंब्याच्या सालामध्ये अँटी-ऑक्सीडंट गुणधर्म असल्याने यात फाईटोन्यूट्रिएंटसचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे आंब्याची साल फुफ्फुसाचा कॅन्सर, कोलन कॅन्सर, ब्रेन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करते.
आंब्याची साल चांगल्या आरोग्यासाठी उपायकारक आहे. याच्या सेवनामुळे ह्रदयाच्या समस्या व कार्डिएक अरेस्ट यासारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.
आंब्याच्या सालीपासून बनविलेला फेसपॅक वापरल्याने चेहरा उजळतो. उन्हामुळे चेहरा, हाताची त्वचा काळी पडली असल्यास आंब्याच्या सालीपासून तयार केलेला फेसबॅक वापरतात.
आंब्याच्या सालीत फायबरचे प्रमाण अधिक असते. यात व्हिटॅमिन ए. सी यासह अँटी-ऑक्सीडंट गुण आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व पचनशक्ती मजबूत होते.
आंब्याच्या सालीमध्ये असणाऱ्या विविध व्हिटॅमिन, तसेच फायबर, कॉपर, फोलेट यांच्यामुळे त्याचा खत म्हणून देखील वापर होऊ शकतो.
(टीप – हि केवळ माहिती म्हणून वाचकांना दिली आहे. आंब्याच्या सालीचे सेवन करण्यापूर्वी किंवा त्याचा फेसपॅक बनवण्यापूर्वी आपल्या आहारतज्ज्ञांशी आणि ब्यूटीशियनशी तसेच डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा. )