टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 जून 2021 – राजकारणातील जाणकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. हि भेट सुमारे साडेतीन तास चालली. त्यामुळे याबाबत राज्याच्या राजकारणात राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत.
भाजपचे फाइंड असणाऱ्या किशोर यांनी मागील निवडणुकीत शिवसेनेसाठी काम केलं होतं. आता, हेच प्रशांत किशोर राष्ट्रवादीच्या पवारांना भेटायला आल्याने काही नवी गणिते जुळत आहेत का? याची चर्चा रंगली होती. यासंदर्भात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी आपलं मत माडलंय. शिवसेनेकडून या भेटीचं स्वागत केलंय.
बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवार यांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंद होईल, असे अरविंद सावंत यांनी म्हटलंय. तसेच, शरद पवार व प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागत आहे.
देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय गरजेचा आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचे फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे. त्यामुळे शरद पवारांनीही तो विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी शिवसेनेचे कौतुक केलंय, असंही सावंत यांनी म्हटलंय.
दोन्ही नेत्यांत साडे तीन तास चर्चा :
शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर सकाळी पोहोचले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केलं. या दोन्ही नेत्यांत सुमारे साडे तीन तास चर्चा झाली.
या भेटीदरम्यान काहीकाळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
म्हणे, भेटीमागे राजकारणाचा विषय नाही :
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही, असे म्हंटल आहे. स्वतः प्रशांत किशोर यांनी हे जाहीर केले आहे की, ते आता राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नाहीत. त्यामुळे राजकारण करण्याचा संबंध येत नाही. शरद पवार अनेकांना भेटतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट होत असते, तशीच ही एक भेट आहे”, असे अजित पवार यांनी सांगितलं आहे.