टिओडी मराठी, मुंबई, दि. 31 मे 2021 – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओके या त्यांच्या निवासस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) भेट घेतली. काहीकाळ या दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्यात.
या भेटीचा फोटो ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलीय. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाली. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवारांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेकदा विविध कारणांसाठी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी हि पवारांची भेट घेतल्याचे एक कारण सांगितले जात आहे.
त्यासह राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि अनेक महत्वाचे मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने यासंदर्भात या भेटीत चर्चा झाली असावी, असे बोलले जात आहे.
या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल केलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावत आरक्षणाला स्थगिती दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या या निकालानंतर ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला.
महाराष्ट्रात ओबीसीसाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेले नाही, असे सांगत फडणवीस यांनी आरक्षण कशा प्रकारे घालवले? हे सांगितले. राज्य सरकार आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Met Former Union Minister & Senior leader Shri Sharad Pawar ji at his residence in Mumbai this morning. This was courtesy meeting.
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/eqjabCHMh7— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 31, 2021