टिओडी मराठी, पुणे, दि. 28 मे 2021 – कोरोनामुळे र्वसामान्य नागरिकांची होणारी लूट थांबण्यासाठी आता रुग्णालयाच्या प्रत्येक बिलाची तपासणी होणार आहे. तसेच यासाठी ऑडिटर नेमण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यामुळे काही रुग्णालयाकडून होणारी नागरिक, रुग्ण यांची आर्थिक लूट थांबण्यास मदत होईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. तसेच यानंतर पत्रकारासोबत संवाद साधला.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होतेय. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती समाधानकारक असून ट्रॅकिंग आणि टेस्टिंग वाढवण्यावर भर देणार आहे.
संस्थात्मक विलगीकरण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गरज पडल्यास त्या ठिकाणी नवीन केंद्र सुरू केलं जाईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
प्रत्येक रुग्णालयातील बिल तपासली जाणार आहेत. रुग्णालयांत ऑडिटर नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिलेत. तसेच खाजगी रुग्णालयात लसीकरण दर वेगवेगळे ते नियमित करण्याचा विचार सुरूय.
यासोबत महात्मा फुले आरोग्य योजनेचा विमा दीड लाखाचा असला तरी त्यावर जरी खर्च लागला तर तो खर्च सरकार देणार आहे, असा अध्यादेश काढला आहे, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.