TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जून 2021 – करोना प्रतिबंधक लशीच्या मात्रा सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर कायम राहिला आहे. आजपर्यंत सुमारे 3 कोटी 27 हजार 217 नागरिकांना लशींच्या मात्रा देऊन त्यांना संरक्षित केलं आहे. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात करोनाचा स्फोट झाला होता. एकीकडे करोनाचा मुकाबला करत असताना लसीकरणाची मोहिम वेगाने पुढे जात होती.

सुमारे 3 कोटी 27 हजार 217 या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सर्वाधिक नागरिकांना लस देणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

महाराष्ट्राने लसीकरणात सुरुवातीपासून आघाडी घेतलीय. त्यासह लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण कमी आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनंदनही केले आहे.

महाराष्ट्रामध्ये 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींच लसीकरण करत होतो. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे. त्यामुळे अठरा पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला आपण लसीकरणाला 22 जूनपासून मान्यता दिली.