टिओडी मराठी, न्यूयॉर्क, दि. 24 मे 2021 – अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल ‘क्लीनिकल इंफेक्शियस डिसीस’ने कोरोना विषाणूची स्वदेशी लस कोव्हॅक्सिन संदर्भात एक चांगली माहिती दिली आहे. त्यांच्या अभ्यासात असा दावा केला आहे की, भारतात आढळून आलेल्या डबल म्युटंट कोरोना व्हॅरिएंटविरुद्ध कोव्हॅक्सिन अधिक प्रमाणात संरक्षण प्रदान करत आहे. हि कोव्हॅक्सिन लस सर्व व्हेरिएंटवर 78% प्रभावी ठरत आहे.
हे व्हॅक्सिन ब्रिटनमध्ये आढळणार्या व्हेरिएंट्ससह इतर अनेक व्हेरिएंटवर प्रभावी ठरत आहे. याअगोदर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) देखील सर्व प्रमुख व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन प्रभावी आहे, असे सांगितले होते.
कोरोना व्हॅक्सीन बनवणारी हैदराबादची भारत बायोटेक कंपनी आहे. ICMR ने कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम क्लीनिकल ट्रायल रिपोर्टमध्ये देखील म्हटले होते की, कोव्हॅक्सिन क्लिनिकल 78% आणि कोरोनाने गंभीरित्या प्रभावित झालेल्या रुग्णांवर 100% पर्यंत प्रभावी ठरत आहे. कंपनीने आपल्या एनालिसिसमध्ये कोरोना विषाणूचे 87 लक्षणांवर रिसर्च केला होता.