टिओडी मराठी, पुणे, दि. 19 मे 2021 – देशात कोरोनाने कहर केला असताना लस निर्यात केल्या गेल्या. यावरून सध्या राजकारण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर लस उत्पादक संस्था सीरम इन्स्टिट्युटने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी जाहीर केलेल्या एका निवेदन म्हटलं आहे की, भारत हा एक मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशाचे 2-3 महिन्यांत लसीकरण करणं शक्य नाही. सोबत आम्ही भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत. अर्थात आम्ही असं केलं नाही. संपूर्ण भारताचं लसीकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
सीरम इन्स्टिट्युटने निवेदनात असंही म्हटलं की, जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसचा भरपूर साठा उपलब्ध होता. त्यावेळी देशात कोरोना लसीकरण मोहिमेने वेग घेतला नाही. या शिवाय कोरोनाची दुसरी लाट देखील आली नव्हती. त्यामुळे भारतीयांनी कोरोना लसशिवाय कोरोनावर मात केल्याचे सर्वांना वाटलं.
यामुळे देशातली कोरोना लसीकरण मोहिम खूप मंदावली. या दरम्यानच्या काळात भारताला लशीची गरज नव्हती. त्यामुळे माणुसकीचा धर्म निभावत अन्य देशांना लस निर्यात केली.
पण, त्यानंतर जेव्हा भारतात कोरोनाची दुसरी लाट आली. तेव्हा याचं देशांनी भारताला मदत केली. लस निर्मितीबाबत विचार केला तर आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय आम्ही सतत लसचं उत्पादन वाढविण्यावर भर देत आहे. त्यामुळे भारताला गरज असताना आम्ही लस निर्यात केली नाही, असे स्पष्टीकरणही सीरम इन्स्टिट्युटकडून दिलं आहे.