TOD Marathi

मुंबई | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अपमानजक वक्तव्याच्या मुद्द्यावरुन बुधवारी विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. या मुद्द्यावरुन विधानसभेत चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली. यावरुन सभागृहात प्रचंड गोंधळ माजला होता. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत आक्रमक शैलीत संभाजी भिडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

मी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केल्यानंतर मला फोन आणि ई-मेलवरुन धमक्या आल्या. धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली, तो जामिनावर सुटला. आमच्या अनेक नेत्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. पण या लोकांना धमकी देण्यासाठी कोणीतरी प्रवृत्त करत आहे, यामागील सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. संभाजी भिडे फ्रॉड माणूस आहे, याची डिग्री काय आहे, त्याने कुठे शिक्षण घेतलंय, हा प्राध्यापक कुठे होता? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, हा माणूस सोनं गोळा करत आहे. आपल्या कायद्याप्रमाणे कुठल्याही संस्थेला वर्गणी गोळा करायची असेल तर त्या संस्थेला जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागते, त्याचा हिशेब द्यावा लागतो.

हेही वाचा ” …संभाजी भिडेंना गुरुजी का म्हणता? फडणवीस म्हणाले, कारण आम्हाला ते…”

मात्र, हा माणूस कितीतरी टनाने सोनं गोळा करत आहे, प्रत्येकाकडून १ ग्रॅम सोनं घेत आहे. लोकांची आणि तरुणांची दिशाभूल करत आहे. ऐन परीक्षेच्यावेळी काहीतरी गडकिल्ल्याची मोहीम काढतो. बहुजन समाजाची मुलं कुठेतरी फरफटत जावीत, हा त्याचा उद्देश आहे, असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज