सातारा | सातारच्या दोन्ही राजेंशी विकासकामासंदर्भात चर्चा झाली, त्यांनी काही निवेदनही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. वादाचे म्हणाल तर अशा गोष्टी कधी-कधी होत असतात, पण तिथे काहीही गंभीर घडले आहे. अशा गोष्टी कधी-कधी होत असतात ते फार अडचणीचे नाही. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील दोन्ही राजांच्या वादावर दिली.
सातारा बाजार समिती इमारतीच्या भूमिपूजनावरून काल साताऱ्यात झालेल्या वादाप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमने-सामने आले होते. त्यामुळे वातावरण खूपच तापले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून कराड दौऱ्यावर आहेत.
हेही वाचा ” …मुख्यमंत्र्यांचा झपाटा बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या; नरेश म्हसकेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा”
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची कराड येथे येऊन स्वतंत्रपणे भेट घेतली. तासभर झालेल्या या चर्चेत सातारा येथील वादाची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, सातारच्या दोन्ही राजेंशी विकास कामासंदर्भात चर्चा झाली, त्यांनी काही निवेदनंही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. वादाचे म्हणाल तर अशा गोष्टी कधी-कधी होत असतात, पण असे नाही की तिथे काही गंभीर घडले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी साताऱ्यातील दोन्ही राजांच्या वादावर दिली आहे.