TOD Marathi

पुणे:
खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. ते सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं हे वक्तव्य म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज्यातील महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही पुण्यात सोमवारी पत्रकार परिषद घेत राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती (MP Udayanraje Bhosale press conference in Pune on Monday and expressed his displeasure against the governor and demanded to take action against the governor).

या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत दिले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असे देखील फडणवीस यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात निषेधाचा सूर सगळीकडे उमटला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे (Shivsena, Congress, NCP, Uddhav Balasaheb Thackeray and MNS) यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्यावर तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Udayanaraje Bhosale, Sambhajiraje Chhatrapati)यांनी देखील राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी केली. या सगळ्या गोष्टी घडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात बोलताना दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते.

3 डिसेंबर रोजी खासदार उदयनराजे भोसले रायगडावर प्रतिकात्मक आक्रोश मांडणार आहेत. त्यानंतर ते दिल्ली दौऱ्यावर जाणार असून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची देखील भेट घेणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची ही सूचक प्रतिक्रिया आगामी काळात होऊ घातलेल्या मोठ्या घडामोडींचे संकेत आहेत का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.