TOD Marathi

पुणे:
दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा हत्या प्रकरणी दोषी आफताब विरुद्ध फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने लाल महाल येथील जिजामाता चौक येथे आंदोलन करण्यात आले.

“गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला धर्म, पंथ जात याची जोड देऊन राजकारण करणं आवश्यक नाही, दोषी हा कोणत्या धर्माचा आहे या पेक्षा त्याने केलेले कृत्य किती गंभीर आहे हे पाहून त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे” काही राजकिय पक्ष या गंभीर व घृणास्पद घटनेचे ही राजकारण करू पाहत आहेत, याचाही समाजाने निषेध करने गरजेचे आहे. या गोष्टीचे राजकारण करून काही लोक धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याप्रवृत्तीचाही निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.