TOD Marathi

शेगाव: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. महाराष्ट्रातून ही यात्रा पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांच्या प्रवासापैकी आता शेवटच्या म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात ही यात्रा प्रवास करणार आहे. नांदेड, हिंगोली, अकोला वाशिम बुलढाणा या पाच जिल्ह्यांमधून भारत जोडो यात्रेचा प्रवास आहे ( Bharat Jodo Yatra is traveling through five districts Nanded, Hingoli, Akola Washim Buldhana.). पाच जिल्ह्यांमधून प्रवास करत असताना राज्याच्या सर्व भागातील लोकांनी राहुल गांधींच्या भेटीगाठी घेतल्या आहे. राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधतात. विविध मुद्द्यांवर मत मांडतात.

सभा कुठे आणि कशा आहेत?

या यात्रेत दोन मोठ्या सभा होत आहेत. त्यापैकी पहिली सभा ही नांदेडला पार पडलेली आहे आणि दुसरी मोठी सभा कदाचित ही सभा या भारत जोडो यात्रेतील सर्वात मोठ्या सभांपैकी एक असू शकेल ती संतनगरी शेगावमध्ये पार पडत आहे. या सभेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी देखील उपस्थित राहणार आहेत. ही सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी विशेष तयारी केली आहे. आठ ते दहा लाख लोकांची उपस्थिती या संख्येला या सभेला राहील असा प्रयत्न काँग्रेसचा आहे. याव्यतिरिक्त जवळपास 10 ठिकाणी राहुल गांधींनी छोट्या सभादेखील घेतलेल्या आहेत. त्या माध्यमातूनही त्यांनी लोकांशी संवाद साधला आहे. शेगाव येथे होत असलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांपैकी कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचा जवळपास सर्व जिल्ह्यांमधून लोक या सभेत आले आहेत, अजूनही लोक येत आहेत. थोड्याच वेळात राहुल गांधी शेगाव येथे सभास्थळी हजर होणार आहे. निवडणुकीचा कालावधी सोडला तर अलीकडच्या काळातील सर्वात मोठी सभा असेल.