पुणे :
राज्यात पावसानं परतीची वाट धरली आणि थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. (Cold weather in the state, lowest temperature recorded in Pune) मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ठाणे, नवी मुंबईत तर घाटमाथ्यावरही हलकी थंडी जाणवायला लागली आहे. राज्यातल्या विविध भागांमध्ये सध्या थंडी वाढल्याचे चित्र आहे. सर्वात कमी तापमानाची नोंद पुण्यात करण्यात आली आहे. पुण्यात १२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.
सरासरीच्या तुलनेमध्ये तापमानात घट झाल्याने थंडी वाढली (Temperature is decreasing) असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आणि हिमालयीन पर्वतरांगांवर होत असलेल्या बर्फदृष्टीमुळे राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यातही शहर आणि लगतच्या भागात अशीच थंडी राहील. पुढील काही दिवस रात्रीचे तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. दरम्यान, दिवसा उन्हाचे चटकेही बसू शकतात. यामुळेच रात्री आणि सकाळी थंडावा जाणवतो.
हिवाळा येत आहे तसं येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरडे हवामान कायम राहणार आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा १.६ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होते. औरंगाबाद (१३ अंश), नाशिक (१३.३ अंश), महाबळेश्वर (१३.८ अंश), सातारा (१४.३ अंश) आणि नागपूर (१४.८ अंश) ही महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणे आहेत जिथे तापमान सामान्यपेक्षा कमी राहिले आहे.