वॉशिंग्टन : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण दिवसागणिक वाढत चालली आहे. रुपया कमकुवत होत असल्यानं ही भारतासाठी गंभीर बाब असल्याची चिंता अनेक अर्थतज्ञ व्यक्त करताना दिसतायत. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक नवा दावा केलाय. रुपया घसरला नसून डॉलर मजबूत होतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. ( Nirmala Sitaraman Comment On Indian Currency )
सितारामन यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत माध्यमांशी बोलताना त्यांनी रुपयाच्या घसरणीकडे बघताना आपण कृपया कमकुवत होत आहे असा विचार न करता डॉलर मजबूत होत आहे असा अर्थ लावला पाहिजे, असा दावा केला आहे.
प्राप्त माहितीनुसार 2022 या वर्षात रूपया दहा टक्क्यांनी घसरला आहे सध्या रुपयाची किंमत प्रति डॉलर ८२.३५ आहे रूपया लवकरच 83 चा आकडा देखील पार करू शकतो. डॉलरच्या वाढत्या किमतीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बराच बसतो आहे.
इंधनांच्या मागून पेट्रोल डिझेल साठी जादा पैसे खर्च करावे लागणार परदेशी प्रवास महागण खाद्य तेलाच्या किमती वाढणं यासोबतच दैनंदिन जीवनातील महागाईला फक्त या रुपयाच्या पडझडीमुळेच सामोर जावं लागतं.
सितारामन यांच्या वक्तव्यावर नेटीझन्स बरेच तोंडसुख घेताना दिसत आहेत. तर अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.