TOD Marathi

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत (CJI Uday Lalit is going to retired) यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. (Justice Dhananjay Chandrachud to be next CJI) त्यामुळे उदय लळीत यांच्यानंतर सरन्यायाधीश पदावर आणखी एक मराठी व्यक्ती विराजमान होणार आहेत. चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जन्म पुण्यात झाला असून धनंजय यशवंत चंद्रचूड असं त्यांचं पूर्ण नाव आहे.

शालेय शिक्षण त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल व जॉन कॅनन स्कूलमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर धनंजय चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पुढील शिक्षण आणि डॉक्टरेट अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड स्कूलमधून मिळवली.

धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात अशा दोन्ही ठिकाणी वकिली केली आहे. (Justice Dhananjay Chandrachud worked in High Court and Supreme court too) जून 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली. 1998 ते 2000 या काळात त्यांनी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून देखील काम केलं आहे. आजपासून 22 वर्षांपूर्वी म्हणजे मार्च 2000 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र ज्यूडिशियल अकॅडमीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2013 ला ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि मे 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. नोव्हेंबर 2024 ला ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना सरन्यायाधीश म्हणून जवळपास दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते. त्यांनी फेब्रुवारी 1978 ते जुलै 1985 या काळात सरन्यायाधीश पदावर काम केलं. वडिलांकडून वकिलीचा वारसा लाभलेले धनंजय चंद्रचूड यांच्या आई शास्त्रीय संगीत गायिका आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज