निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवल्यानंतर (Election commission freezes Shivsena party symbol) ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटांमध्ये सामना चांगलाच रंगला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनीही याबद्दल ट्विटरवर भूमिका मांडत पुन्हा एकदा ठाकरे गटाला लक्ष केलं आहे. आयोगाकडून दोन्ही गटांना नवे नाव निश्चित झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे (Sushma Andhare speech Dasara Melava) यांनी मैदान गाजवलं होतं. त्यानंतर शिंदे गटाकडून शितल म्हात्रे यांनी अंधारे यांच्यावर पलटवार केला होता. तसेच ठाकरे गटाकडून होणाऱ्या टिकेला शिंदे गटाच्या प्रवक्त्या बनून म्हात्रे उत्तर देत असतात. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतरही त्यांनी ट्विट वरून भूमिका मांडली होती. शिवसेना आणि शिंदे गटाला दिलेल्या नावावरून देखील त्यांनी आता ठाकरे गटावर टीका केली आहे. सोबतच धनुष्यबाने चिन्ह भविष्यात आम्हालाच मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळाले असून ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव उद्धव ठाकरे गटाला मिळाले आहे. त्यावरून म्हात्रे यांनी शिवसेनेवर एक व्हिडिओ पोस्ट करत टीका केली आहे. शिवसैनिकांच्या मनातील नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला मिळालं असून ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. आमच्या नावामध्ये प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचे नाव आहे, बाकी ज्यांना जे मिळाले त्यात प्रथम मी नंतर बाळासाहेब… लोकांना याचा अर्थ कळत असेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही आमचं चिन्ह आयोगाकडे देऊ मात्र हे चिन्ह तात्पुरतं असेल भविष्यात धनुष्यबाण हेच आमचे चिन्ह आम्हाला मेरिटवर मिळेल, असा विश्वास देखील शितल म्हात्रे (Sheetal Mhatre criticized Thackeray group) यांनी व्यक्त केला.
हिंदुत्वाचा बाणा…#बाळासाहेबांची_शिवसेना pic.twitter.com/HDn9Wvn2UP
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) October 10, 2022