शिवसेनेचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्ह आणि तीन नाव देखील दिलेली आहेत. (CM Eknath Shinde submitted party symbol and names to EC) यापूर्वी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्र देण्याची मुदत ठाकरे गटाला देण्यात आली होती. विहित मुदतीत ठाकरे गटानं आपली कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी उशिरा निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे गोठवलं होतं. आणि रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तीन नाव आणि तीन चिन्ह हे पर्याय म्हणून मागितले होते. ते ठाकरे गटाने दिल्यानंतर सोमवारी एकनाथ शिंदे यांनी देखील निवडणूक आयोगाला पक्ष चिन्ह आणि पक्ष नावासाठी तीन पर्याय दिलेले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पक्ष चिन्ह आणि पक्ष नावासाठी तीन पर्याय दिलेले आहेत.
१. शिवसेना बाळासाहेब ठाकरे
२. बाळासाहेबांची शिवसेना
३. शिवसेना बाळासाहेबांची
हे तीन पर्याय एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नावासाठी निवडणूक आयोगाकडे दिले आहेत.
१) त्रिशूल
२) उगवता सूर्य
३) गदा
हे तीन पक्षाचे चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पर्याय म्हणून दिले आहेत.
या तीन नावांपैकी आता कुठलं नाव एकनाथ शिंदे (Election Commission of India) यांना पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव म्हणून मिळतं, हे बघावं लागेल. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाने तीन पक्ष नाव आणि तीन पक्ष चिन्ह दिले आहेत. रविवारी मात्र एकनाथ शिंदे गटाने जुन्याच पक्षावर जुन्याच पक्ष चिन्हावर दावा कायम ठेवला होता, तशी महिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली होती. दोन्ही बाजूंनी आता पक्ष चिन्ह आणि पक्ष नावं दिल्यानंतर याबाबत आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे बघावे लागणार आहे.