TOD Marathi

80व्या वाढदिवसाच्या पूर्वसंधेला ‘बिग बी’ यांनी चाहत्यांना दिली खास भेट

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन मंगळवारी 80 वर्षांचे होणार आहे. सोशल मीडियावर या निमित्त स्पेशल सेलिब्रेशन सुरू झाले आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Birthday) यांनीही त्यांच्या वाढदिवसापूर्वी त्यांच्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आगामी ‘उंचाई’ (Uunchai) या चित्रपटातील त्याचा डॅशिंग लूक शेअर केला आहे. चित्रपटाचे हे पोस्टर समोर येताच काही वेळातच व्हायरल झाले आहे.

‘ऊंचाई’ बद्दल बोलायचे झाले तर हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी एकत्र काम केले आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ‘ऊंचाई’
बद्दल बरेच काही लिहिले आहे. फ्रेंडशिप डेच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये मैत्रीचा भाव अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आला आहे. या पोस्टरची टॅगलाईन आहे- मैत्री हीच त्यांच्या जीवनाची प्रेरणा होती! मैत्रीवर आधारित या चित्रपटाची थीम लक्षात घेऊन वीरू म्हणजेच धर्मेंद्र ने जयला म्हणजेच अमिताभ यांना त्याच्या ‘ऊंचाई’चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या (Amitabh Bachchan And Dharmendra)

राजश्री फिल्म्स,(Rajshri FIlms) महावीर जैन फिल्म्स आणि बाउंडलेस मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वयाची 80 वर्षे पूर्ण केल्यानंतर अमिताभ यांचा रिलीज झालेला ‘ऊंचाई’ हा पहिला चित्रपट असणार आहे. सूरज बडजातीया दिग्दर्शित हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.