राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली ६ सप्टेंबर रोजी सुरु झालेली ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) कन्याकुमारी ते काश्मीर असा ३५०० किलोमीटरचा प्रवास १५० दिवसात पूर्ण करणार आहे. हि यात्रा सध्या कर्नाटकमधुन जात आहे. या यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय. भाजपच्या वतीने (BJP) या यात्रेवर टीका करण्यात आली तर काँग्रेस नेते आणि पदाधिकारी यांनी मात्र या यात्रेचं चांगलंच समर्थन केलंय.
६ तारखेला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या भारत जोडो यात्रेत काही काळ सहभागी झाल्या. बऱ्याच काळापासून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाला नव्हत्या. काही दिवसापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी त्या विदेशातही गेल्या होत्या.
यात्रा सुरू होऊन काही दिवस लोटले मात्र सोनिया गांधी (Sonia Gandhi) या यात्रेत सहभागी झाल्या नव्हत्या. गुरुवारी सोनिया गांधी (Sonia Gandhi) या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. प्रकृतीच्या कारणास्तव राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांना जास्त चालू दिलं नाही मात्र तरीही काही काळ सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत चालल्या. सोनिया गांधींच्या भारत जोडो यात्रेतील उपस्थितीमुळे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ही नवा उत्साह पाहायला मिळाला.