TOD Marathi

भंडारा:
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मागील काही दिवसापासून सिटी 1 वाघाने धुमाकूळ घातला आहे. हा वाघ भंडारा, गोंदिया, गडचिरोली (Bhandara, Gondia, Gadchiroli) या तीन जिल्ह्यात भ्रमंती करीत असून आतापर्यंत 18 जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी पूर्णपणे धास्तावलेले असून शेतीवर जाण्यास धजावत आहेत. अशा नरभक्षी वाघाला कोंबिंग ऑपरेशन करून ठार करावे, अशी मागणी नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

लाखांदूर तालुक्यातील कन्नड गाव येथील दोन व्यक्ती शेतावर धानाचे पीक पाहणी केल्यानंतर जवळच शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेला असता सिटी वन या नरभक्षी वाघाने अचानक हमला करून शिकार केली ज्यात एकाचा जीव गेला. तर प्रसंगावधानामळे प्रल्हाद प्रधान (Prahlad Pradhan) हा झाडावर चढल्याने त्याचा जीव वाचला.

ही घटना मागील शुक्रवारी सकाळी घडली होती. घटनेनंतर परिसरात मोठी दहशत पसरली आहे. या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Prahlad Pradhan) यांनी मृतक तेजराम (Tejram) यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वना केली.

लाखांदूर वन विभागाच्या सोबतच गडचिरोली तसेच गोंदिया जिल्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नरभक्षी वाघास पकडण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, सिटी वन या वाघ सतत हुलकावणी देत असल्याने पुन्हा किती बळी घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पसरलेली दहशतीमुळे आता त्या नरभक्षी वाघाला कोंबिग आपरेशन करून ठार मारण्यात यावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.