महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित दसरा मेळावे (Dasara Melava) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेले आहेत. या दसरा मेळाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. यंदा प्रथमच शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा (Uddhav Thackeray Eknath Shinde)असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या भाषणांची प्रचंड उत्सुकता अनेकांना लागली आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण ही दोन्ही भाषणं ऐकणार नसल्याचे सांगितले आहे.
कारण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बुधवारी नागपूर येथे धम्मचक्र परिवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जेव्हा हा कार्यक्रम सुरु असेल तेव्हाच दसरा मेळावे (Dasara Melava) सुरु असतील. त्यामुळे मला दसरा मेळाव्यातील दोन्ही भाषणं ऐकता येणार नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.
मात्र, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दसरा मेळाव्याच्या सुरक्षा व्यवस्थेकडे पुरेपूर लक्ष पुरविले आहे. दोन्ही दसरा मेळावे अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं कठोर पालन केले जाईल. मात्र, सध्या जी परिस्थिती आहे, त्याकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणीही या गर्दीचा गैरफायदा घेऊ नये. अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचा इशाराच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. सभेतील भाषणं योग्य भाषेत होणं अपेक्षित आहे. भाषण हे खुसखुशीतही करता येतं. कोणाची अवमानकारक वक्तव्य त्यात नसावीत. काही चुकीची वक्तव्य झाली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे आणि शिंदे गटाच्या (Uddhav Thackeray Eknath Shinde) दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची जणु स्पर्धा सुरू आहे. लहान-मोठ्या अशा एकूण थोड्या थोडक्या नव्हे तर दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यामध्ये जवळपास सहा हजार एसटी तसेच खासगी गाड्यांचा समावेश आहे.
इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांचे स्वतंत्र मेळावे होणार असल्याने गर्दी जमवण्यासाठी मोठा खर्चही केला जात आहे.